Thursday, September 6, 2012

"बुलडाणा जिल्हा सहकारी बँक संचालकांविरुद्ध खामगावात फौजदारी"

बुलडाणा जिल्हा सहकारी बँक संचालकां विरुद्ध खामगावात फौजदारी
(05-09-2012 : 00:58:46)
- न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश
खामगाव। दि. ४ (प्रतिनिधी)
आर्थिक अडचणीत सापडलेल्या बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्मचारी प्रतिनिधींसह सर्व संचालक मंडळ तसेच खामगाव शाखा व्यवस्थापकासह एकूण ३७ जणांविरुद्ध बँकेच्या एका सभासदाने येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात खाजगी फौजदारी दाखलकेली आहे. या प्रकरणी आज सुनावणी होऊन न्यायालयाने चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अँड. शशिकांत वामनराव बगे हे नांदुरा येथील रहिवासी असूनखामगाव न्यायालयामध्ये वकिलीचा व्यवसाय करतात. त्यांनी बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या खामगाव येथील मुख्य शाखेमध्ये बचत खाते उघडले असून त्याचा क्रमांक हा ३00१६ असा आहे.
३१ ऑगस्टपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये १ लाख ९७ हजार ३८९ रुपये जमा आहेत. अँड. बगेयांना पाठीच्या मणक्याचा त्रास असून त्यांचा उपचार सुरु आहे. या उपचारासाठी त्यांना वेळोवेळी पैशाची गरज पडते. त्यामुळे त्यांनी गरज असताना सहकारी बँकेच्यायेथील मुख्य शाखेकडे अगोदर रीतसर कळवून व नंतर विड्रॉल भरुन पैशाची मागणी केली. मात्र, सहकारी बँकेच्या येथील शाखेने त्यांच्या खात्यामध्ये रक्कम असतानाहीत्यांना पैसे दिले नाही. यासंदर्भातील त्यांचे ६ ऑगस्ट रोजी २0 हजार रुपये, २३ ऑगस्ट रोजी ५0 हजार रुपयेतसेच ३१ ऑगस्ट रोजीचा १ लाखाचा विड्रॉल बँकेने न स्वीकारता परत पाठविला. या सर्व प्रकारामुळे त्यांना आपल्या आजारावर उपचार करता आले नाही.
दरम्यान, वेळोवेळी बँकेने विड्रॉल देण्यास मनाई केल्याने अँड. शशिकांत बगे यांनी आज ४ सप्टेंबर रोजी यासंदर्भात येथील न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक १ मध्ये खाजगी फौजदारी दाखल केली. त्यामध्ये ३१ ऑगस्ट रोजी १ लाख रुपयांची नितांत आवश्यकता असताना व आपल्या खात्यात पुरेसे पैसे असतानाबँकेने पैसे दिले नाही. त्यामुळे आपला बँकेवर असलेल्या विश्‍वासाला तडा बसून आपली फसवणूक झाली. यालाबॅंकेचे सर्व संचालक, केंद्रीय शाखेचे संचालक मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, खामगाव शाखेचे व्यवस्थापक जबाबदार असल्याने त्यांचेविरुध्द कलम ४0३, ४0५, ४0९, ४२0, ३४ नुसार कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.या तक्रारीमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आ. धृपदराव सावळे, उपाध्यक्ष खा. प्रतापराव जाधव, संचालक आ. विजयराज शिंदे, आ. राहुल बोंद्रे, आ. चैनसुख संचेती, आ. संजय कुटे, आ. संजय रायमुलकर, बलदेवराव चोपडे, पांडुरंग पाटील, बाबूराव कोल्हे, नरेंद्र बोबडे, विश्‍वास बोरोकार, रमेश उमाळे, अशोक हटकर, रियाजखॉ पठाण, वामन झोरे, संतोष रायपुरे, बळीराम मापारी, रामदास भोंडे, मीनाक्षी बुरुंगले, अरुणा पवार, शारदापाटील, सुनीता शिंदे, अशोक खरात, एम. ए. कोहोक, पांडुरंग फुंडकर, आशिष मोदी, विनायक कोलते, किशोर बोबडे, विजय मारोडे, नरेंद्र बाहेकर, राजेंद्र बकाल, ए. एस. चव्हाण, ए. डी. इंगोले, व्ही. बी. पारडे व खामगाव शाखा व्यवस्थापक संतोष गिरी यांचा समावेश आहे.या प्रकरणीविद्यमान न्यायदंडाधिकारी कोर्ट १ च्या न्या. पी. डी.मोरे यांनी कलम १५६ (३) सीआरपीसी अनुसार पोलिसांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करावा असे आदेश दिले. या प्रकरणी अँड. बगे यांचेवतीने अँड. मंदीपसिंग चव्हाण यांनी कामपाहिले.
एकाच दिवसात सुनावणी
अँड. शशिकांत बगे यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकांविरुद्ध आज ४ सप्टेंबर रोजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात फौजदारी दाखल केली. त्यावर आजच न्यायालयाने सुनावणी घेऊन संध्याकाळी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

No comments:

Post a Comment