Friday, September 7, 2012

वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमीपाऊस

वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
(05-09-2012 : 00:54:33)
- वाशिम जिल्ह्याची परिस्थिती गंभीर
- बुलडाणा जिल्ह्यात १९ टक्के कमी पाऊस
अकोला। दि. ४ (प्रतिनिधी)
यावर्षी विदर्भात पावसाची उशिरा सुरुवात झाली असून सोमवारपर्यंत झालेल्या पावसामुळे काही जिल्ह्याने सरासरी गाठली आहे. वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वर्‍हाडातील अकोला, अमरावतीव यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थिती समाधानकारक आहे.
पश्‍चिम विदर्भातील बुलडाणाजिल्ह्यात आजपर्यंत ४४६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोविस तासात ४.0 पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा १९ टक्के कमी असल्याने या ठिकाणी शेती, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
वाशिम जिल्ह्यात आजपर्यंत ६८५.६ मि.मी. पाऊस झाला असून, गेल्या चोविस तासात ३१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरी २ टक्क्याने कमी आहे. अकोला जिल्ह्यात ६४६.६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, गेल्या चोवीस तासात ४0 मि.मी. पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा ८टक्क्याने जास्त असल्याची माहिती हवामान खात्याच्या सूत्राने दिली आहे.
यवतमाळ जिल्हय़ात आजपर्यंत ७४१.२ मि.मी. पाऊस झाला असून, गेल्या चोविस तासात ४.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सामान्य आहे. अमरावती जिल्हय़ात सरासरीपेक्षा १२ टक्के जास्त पाऊस झाला आहे.
भंडारा जिल्ह्यात १११0. ३ मि.मी. पाऊस झाला असून, सरासरीपेक्षा १३ टक्के जास्त आहे.चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत १0५८.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सरासरीपेक्षा ९ टक्के पाऊस येथे जास्त झाला आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १0२९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
हा पाऊस सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी आहे. गेल्या चोविसतासात या जिल्ह्यात २१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्हय़ात आतापर्यंत ५७८ मि.मी. पाऊस झाला असून, गेल्या चोविस तासात ३६.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरी या जिल्ह्यात सरासरीपेक्षा २३ टक्के पाऊस कमी झाला आहे.
नागपूर जिल्हय़ात ७१८.९ मि.मी. पाऊस झाला असून, सरासरीपेक्षा ९ टक्के जास्तआहे.
अकोला जिलत सरासरी ४0 मि.मी. पाऊस
अकोला जिलत गेल्या चोविस तासात ४0 मि.मी. पाऊस झाला असून, आकोट तालुक्यात १४.८ मि.मी., तेल्हारा 0.५, बाळापूर३१, पातूर ७५, अकोला शहर ७९.१,बाश्रीटाकळी ७0 व मूर्तिजापूर तालुक्यात १0 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment